सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ मर्यादित

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र राज्यात सहकारी व खाजगी क्षेत्रातील जवळपास २००+ साखर कारखाने असून ऊस तोडणी ते साखर कारखान्या पर्यंत ऊस पोहचविणे इत्यादी अनेक प्रकारच्या कामाकरिता कामगारांची सात ते आठ महिन्यांपर्यंत आवश्यकता असते. हे सर्व कामगार मजूर मुख्यत्वेकरून मराठवाड्यातील गावांमधून येतात आणि मर्यादित काळासाठी कामाच्या ठिकाणी सहकुटुंब स्थलांतरीत होतात.

अशा ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांचे जीवन सुखकारक करून त्यांचे राहणीमान उंचावून, आयुष्य स्थिर व सुरक्षित करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस कामगार कल्याण महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे.

महामंडळा मार्फत ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करणे व त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्याकरिता प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.

या प्रणाली मार्फत ऊसतोड कामगारांची संपूर्ण माहिती जशी मूलभूत माहिती (नाव,मुळगाव, पत्ता, वय, शिक्षण), कुटुंबाची माहिती, आरोग्य संदर्भातील माहिती, बँक खात्याची माहिती, मूळगावी उपलब्ध सोयी (शौचालय, वीज, पाणी इत्यादी) तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत असल्यास त्याबाबतची माहिती इत्यादी सर्व संकलित केली जाईल.

मोबाईल अँप ऊसतोड कामगारांची माहिती नोंदविण्यासाठी मोबाईल अँप नजीकच्या भविष्यकाळात

डाउनलोड फॉर अँड्रॉइड प्रशिक्षण व्हिडिओ